तळेगाव येथील ग्रामसेवक श्री रवींद्र तायडे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न....
एका मोठ्या मनाची सेवापूर्ती सोहळा संपन्न– ग्रामसेवक श्री. रवींद्र तायडे
जामनेर येथील तळेगांव येथे कार्यलत ग्रामसेवक तायडे हे 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने जिल्हा परिषद कन्या शाळा येथे 31 मे रोजी सकाळी 10 वाजता सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री.रवींद्र तायडे ग्रामसेवक यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. २००2 मध्ये जामनेर तालुक्यात लहासर, सामरोद ,तळेगाव ग्रामसेवक म्हणून रुजू झाले. रावेर तालुक्यात सारख्या आदिवासी भागात आठ वर्ष ग्रामसेवक म्हणून सेवा बजावली. रवींद्र तायडे ग्रामसेवक हे कर्तुत्व संपन्न जीवन-साधनाने ग्रामसेवक म्हणून अविरतपणे ३0 वर्षे जनतेची सेवा करीत आले. हा माणूस म्हणजे व्यक्तिगत जीवनात सहजतेने स्नेह जपत, सुसंस्कृत वाणी, वर्तनाची अभिजात संस्कृती जपणारा, निसर्गप्रेमी, प्रसन्नचित निरंतर हसमुख व्यक्तिमत्त्व, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्मिकतेची जोड लावून संगम निर्माण केला आहे. काम करत असताना सरांनी कधीही मोठेपणाचा आव आणला नाही वा, मिरविला असं कदापि पहावयास मिळाले नाही. चुकीच्या शब्द काढला असे तरी वाटले नाही. मान्यवरांच्या वतीने सेवानिवृत्त श्री रवींद्र तायडे यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामसेवक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा