जामनेर येथे तंबाखु विरोधी दिन साजरा तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन न करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर येथे तंबाखु विरोधी दिन साजरा तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन न करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग व इंडियन डेंटल असोसिएशन जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखु विरोधी दिनाचे आयोजन पंचायत समिती सभागृहात करण्यात आले.
सदर प्रसंगी आरोग्य कर्मचारी,पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी व उपस्थित उपस्तीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुजनाने करण्यात आली.
सदर प्रसंगी इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ.आशिष महाजन यांनी तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थांचे दुष्परिणाम याविषयी माहिती देऊन चित्रफीत दाखवली.तंबाखु जन्य पदार्थांच्या सेवनाने नाक, कान, घसा,तोंडाचा व फुफ्फुसाचा कॅन्सर होतो व तो जीवघेणा ठरू शकतो त्यामुळे तंबाखु किंवा तंबाखु जन्य पदार्थाचे सेवन कुणी करीत असल्यास सेवन सोडण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी या प्रसंगी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र सूर्यवंशी व आभार डॉ.पल्लवी राऊत यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी प्रा. सुधीर साठे,डॉ.प्रशांत सारताळे, डॉ.संदीप कुमावत,डॉ.भाग्यश्री  बावसकर,डॉ.शारीक काद्री,डॉ.मोहिनी मोरे,आशा कुयटे, सलील पटेल,अतुल चिमकर,त्रंबक तव्वर उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads