महाराष्ट्र
‘राईट टू गिव्ह अप’ पर्याय चुकीने निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 जून पर्यंत अंतिम संधी.....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :- जिल्हयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवता शिष्यृत्ती व विद्यावेतन या योजनेचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने ‘राईट टू गिव्ह अप’ हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अश्या विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे दि. 30 जून 2024 पर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या ऑनलाईन फेर सादर करणे आवश्यक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेर सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील याची कृपया नोंद घ्यावी. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा