राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवता पुरस्कार प्रस्ताव तात्काळ सादर करावेत :- समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले - दैनिक शिवस्वराज्य

राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवता पुरस्कार प्रस्ताव तात्काळ सादर करावेत :- समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले


समीर शेख प्रतीनिधी
सोलापूर :- शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने या कार्यालयामार्फत अनुसूचितजाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवता पुरस्कार शिष्यृत्ती या योजनांचा लाभ देण्यात येतो. जिल्हयातील महाविद्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सन 2019-20 ते सन 2022-23 मधील बोर्ड यादीनुसार पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रस्ताव अजुनही विद्यालयांकडुन आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त न झाल्याने प्रलंबित आहेत. सदर तात्काळ या कर्यालयात पाठविण्यात यावेत असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.
      इयत्ता 10 वी व इयत्ता 12 मधून बोर्डाच्या यादीत प्रथम आलेले पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव (खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची छांयाकित प्रत व जातीचा दाखला, आधार कार्ड मार्कलिस्ट) सर्व आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर या कर्यालयास सादर करण्यात यावेत. अन्यथा सदर रक्कम शासन खाती जमा करण्यात येईल व विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शाळा, महाविद्यालय राहील याची नोंद घ्यावी. असे आवाहनही समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads