जामनेरात मुसळधार पावसाने लावली हजेरी...
जळगाव जिल्ह्यांमध्ये आज मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर या तालुक्यांमध्ये सायंकाळ सात वाजताच्या सुमारास जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी प्रचंड उन्हामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते, परंतु या पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अशाच पद्धतीने मान्सूनला वेळेवर सुरुवात झाल्यास शेतातील पेरण्या लवकर होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा