जामनेर आगाराचे वाहतूक नियंत्रक संजय कुमावत यांचा गौरव ..विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे सन्मानपत्र प्रदान
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील वाहतूक नियंत्रक संजय भाऊलाल कुमावत हे आपली सेवा पूर्ण करुन नुकतेच सेवानिवृत्त झाले. ते एस.टी. महामंडळात सर्वत्र उत्कृष्ट उद्घोषक म्हणून सर्वांना परिचित आहेत. तसेच त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांनी ओळख निर्माण केली आहे. याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे पवन माळी, रवि झाल्टे, मोहन सुरवाडे, जीवन राठोड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच त्यांचा अनेकांनी गौरव करुन त्यांच्या सेवेचे कौतुक केले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा