सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत दोन लाख वह्यां वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ.. लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण.. - दैनिक शिवस्वराज्य

सागर सिमेंट व एम के फाऊंडेशन च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत दोन लाख वह्यां वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ.. लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण..


समीर शेख प्रतिनीधी
सोलापूर : आज दि. २० जुन रोजी कर्मयोगी अप्पासाहेब काङादी सांस्कृतिक भवन, साखर कारखान्या जवळ होटगी रोङ सोलापूर येथे दुपारी १२वाजून ३० मिनिटानी लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या शुभहस्ते शालेय विद्यार्थांना वह्याचे वाटप होणार आहे. सदर कार्यक्रमास श्री.ब्र. श्री.शिवपुत्र महास्वामीजी, वेदमूर्ती महांतेश हिरेमठ, धर्मराज काङादी, दत्तात्रय मुळे, आनंद लोणावत (सागर सिमेंट सेल्स प्रमोटर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकसह शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थासह उपस्थिती रहावे, असे आवाहन एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी केले आहे.
   समाजातील वंचित व उपेक्षित विद्यार्थांना विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातील अनेक समस्या ती उंचीच सोडवते. या धर्तीवर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे हि मोठी समाजाची जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून दरवर्षी एम के फाऊंडेशन च्या माध्यमातून संस्थापक-अध्यक्ष महादेव कोगनुरे लाखो विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य देवून महत्वपूर्ण वाटा उचलतात. जुन महिन्याच्या सुरुवातीला शाळा सुरु होताना विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम होतो. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ असा अप्रतिम कार्यक्रम घेऊन आल्याबद्दल समाजातील सर्वच क्षेत्रातून महादेव कोगनुरे यांचे कौतुक होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads