मंत्री गिरीष महाजन यांच्या निवास्थानी सौ.साधना महाजन यांच्या हस्ते प्रथमेश निलेश पाटील यांचा सत्कार... - दैनिक शिवस्वराज्य

मंत्री गिरीष महाजन यांच्या निवास्थानी सौ.साधना महाजन यांच्या हस्ते प्रथमेश निलेश पाटील यांचा सत्कार...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
प्रथमेश निलेश पाटील NEET परीक्षेत ७२०/६७५ गुण मिळवून तालुक्यातून प्रथम जामनेर  येथील एकलव्य प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक निलेश हरी पाटील यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील यांनी प्राथमिक शिक्षण एकलव्य विद्यालयात घेऊन ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर येथे १२वी विज्ञान शाखेत प्रथम येऊन स्वतः डॉक्टर चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द व मेहनत करून कोणताही क्लास न लावता नीट परीक्षेत (NEET) एकूण ६७५ गुण मिळवत जामनेर तालुक्याचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचावले आहे. त्याबद्दल मा.ना. गिरीष महाजन (ग्रामविकास व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी अभिनंदन केले. व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.तर संस्थेच्या सचिव तथा मा. नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या शुभहस्ते प्रथमेश पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पेढे देऊन स्वागत केले. त्यावेळी दिपक तायडे (मा.नगरसेवक तथा स्वीय सहाय्यक), आतिष झाल्टे (जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक),रविंद्र झाल्टे(शहर अध्यक्ष भा ज पा) विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे ,निलेश पाटील (उपशिक्षक), विलास पाटील (उपशिक्षक)यांच्यासह भा ज पा चे कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले असून तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads