जामनेरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या अटक ...एलसीबीची कारवाई
जामनेर: जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर शहरातुन विनापरवाना गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे. निलेश मोरे (वय-२३) रा. दामले प्लॉट जामनेर, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
त्याच्याविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अधिक माहिती अशी की,
जामनेर शहरातील दामले प्लॉट भागातील शुक्रवार १२ जुलै रोजी रात्री ८ वाजता जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रणजीत जाधव हे पेट्रोलिंग करत असताना परिसरात संशयित आरोपी निलेश मोरे हातात गावठी बनावटी पिस्तूल घेऊन दहशत माजवत असल्याची महिती मिळाली त्यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महिती दिली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी कारवाईच्या सुचना दिल्या.पो.कॉ कमलाकर बागुल, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील, यांनी कारवाई करत संशयित आरोपी निलेश मोरे, याला अटक केली. संशयीताकडुन गावठी बनवटी पिस्तूल जप्त करण्यात आले. आरोपीला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा