माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. प्रा. मराठी शाळेमध्ये युवा सेने तर्फे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप
जामनेर तालुका तोंडापूर येथे मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. प्रा. मराठी शाळेमध्ये युवा सेने तर्फे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा गुरव यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन एक खारीचा वाटा म्हणून एक समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतला असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित युवा सेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा गुरव, शिवसेना उप तालुका प्रमुख कृष्णा चोरमारे, रवींद्र अपार सागर केणेकर इकबाल शेख शिकलकर अजय लोखंडे सुरेश दांडगे शांताराम गवळी आनंद महाराज इंगळे योगेश गवळी महेंद्र भोई युवा शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते या स्तुत्य उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक श्री उदयसिंग पवार शांताराम पाटील दिनेश इंगळे प्रवीण वाघमारे कौशल्या बिराजदार अश्विनी ताठे मंजुषा ताठे दीपिका आवाळे यांनी कौतुक केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा