शासनाविरोधात प्रचलित अनुदानाच्या मागणीसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलनाने सोलापूर जिल्हा परिषद दणाणले.... - दैनिक शिवस्वराज्य

शासनाविरोधात प्रचलित अनुदानाच्या मागणीसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलनाने सोलापूर जिल्हा परिषद दणाणले....

समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर -दि २६.महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील समविचारी संघटनांना सोबत घेऊन सोलापूर जिल्हापरिषदेच्या पुनम गेटसमोर विनाअनुदानित शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. सदर मोर्चाचे आयोजन खंडेराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
     यावेळी आंदोलकांना संबोधित करताना खंडेराव जगदाळे म्हणाले की, लाडकी बहीण-लाडका भाऊ यांना झुकते माप, मग आम्ही विनाअनुदानित शिक्षकांनी काय केले पाप? 
     १२ जुलै २०२४ रोजी शिक्षणमंत्री महोदयांनी सभागृहात जून २०२४ पासून वाढीव टप्पा दिला जाईल अशी सभागृहात घोषणा केली असूनही या शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यासंदर्भात शासन निर्णय काढलेला नाही. मंत्रालयातील अधिकारी लोक मंत्री महोदयांना चुकीचे मार्गदर्शन करत असल्याने दररोज नवनवीन पत्रे निघत आहेत मात्र अनुदान मिळत नाही.परंतु सदर घोषणेचा आदेश अद्यापही निघालेला नाही. शासनाने पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावा व १५ मार्च २०२४ चा जाचक संचमान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा, खालील मागण्या मान्य करून न्याय द्यावा अन्यथा आम्ही १ ऑगस्ट पासून उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी खंडेराव जगदाळे यांनी दिला.
▪️१५ मार्च रोजीचा संचमान्यता आदेश रद्द करणे 
▪️शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल करावी 
▪️सेवानिवृतीचे वय ५८ वरून ६० करावे 
▪️पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्यात या मागण्यांचाही या मोर्चात सहभाग होता. 
 यावेळी पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार भगवान (आप्पा) साळुंके, वंचित बहुजन शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोळसे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे,शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष गायकवाड,महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर सगेल,स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ,संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल दारफळे,अघोषित शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बमेश पाटील, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे नादील शेख,महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे मारूती खरात यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनिंनी उपस्थित होते.सदर आंदोलनाचे नियोजन सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे, अध्यक्ष राजशेखर म्हमाणे व सचिव शितलकुमार पाटील यांनी केले होते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads