यशवंत विद्यालय औराद येथे कै. गुरुसिद्धप्पा हविनाळे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटप.... - दैनिक शिवस्वराज्य

यशवंत विद्यालय औराद येथे कै. गुरुसिद्धप्पा हविनाळे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटप....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : यशवंत विद्यालय औराद ता.द.सोलापूर येथे कै. गुरुसिद्धप्पा हविनाळे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे गरजूवंत विद्यार्थ्यांना दहा सायकली वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. 
    संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सि. जि.हवीनाळे यांच्यातर्फे देण्यात आले व तसेच यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना राऊंड टेबल फोर्टी वन या सामाजिक संस्थेतर्फे डिजिटल क्लासरूम साठी एक प्रोजेक्टर प्रशालेस भेट म्हणून देण्यात आले.याचे उद्घाटन डॉ. सी.जी. हवीनाळे यांच्याहस्ते करण्यात आले.
  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव एम डी कमळे सर हे होते व तसेच त्यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक केवटे सर यांनी केले. 
   यावेळी या कार्यक्रमाला औराद गावचे सरपंच शशिकांत बिराजदार , राजुर गावचे सरपंच लक्ष्मण गडदे, माजी सरपंच शांत कुमार गडदे, संजवाड गावचे माजी सरपंच पंडित बुळगुंडे सावकार , माजी मुख्याध्यापक संगप्पा पाटील सर, चितळे प्रशालेचे प्राचार्य कोळी सर, अमसिद्ध बुळगुंडे, पत्रकार श्रीकांत हाले, श्रीकांत बनसोडे तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads