गुन्हेगारी कृत्य खपवून घेणार नाही पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार ...
नुकतेच जामनेर पोलीस स्टेशन येथे रुजू झालेले नूतन पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांचे निर्भीड पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील इंगळे तसेच शिवस्वराज्य न्यूज चे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे ,महाराष्ट्र संदेश न्यूज चे संपादक साहेबराव शिरसागर, उपसंपादक अरुण तायडे, केशरीराज न्यूज चे जामनेर तालुका प्रतिनिधी देविदास विसपुते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नूतन पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी सांगितले की पोलिस व नागरिक मित्रत्वाचे संबंध असले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करू. जास्तीत जास्त पोलिसिंग कसे राबवता येईल, याला प्राधान्य देण्यात येईल तर हे करत असताना कोणत्याही गुन्हेगाराचे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही. प्रत्येक नागरिकाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असे काम करू, अशी ग्वाही पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी पत्रकाराना माहिती दिली.कायदा आणि सुव्यवस्था अभेद्य राखण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले जातील. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल व नागरिकांना सुरक्षितता वाटेल. जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे पोलिस स्टेशनला जोडले गेलेले आहेत. दोन्हींचाही समतोल राखून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कायद्याचा धाक रहावा. यासाठी कडक कारवाई केली जाईल. गुन्हेगारी प्रवृत्तींची गय केली जाणार नाही असेही नूतन जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी सांगितले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा