जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली गावात घाणीचे साम्राज्य ... नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली गावात घाणीचे साम्राज्य ... नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गावातील संपूर्ण रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांतून बोलले जाते या गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ह्या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. गावांमध्ये बहुतांश रस्त्यांचे बांधकाम झालेले नसल्याने गटारं देखील बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गावातील संपूर्ण सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याने सर्वदूर गटारे साचली आहेत, असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. या साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे देखील नागरिक बेजार झाले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव होत असल्याने या घाणीचे साम्राज्या परसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी वेळोवेळी तोंडी तक्रारी केल्या, मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावातील समस्यांचे निवारण करावे अशी मागणी करण्यात आली आहे
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads