शेवटच्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध.. मंत्री गिरीष महाजन - दैनिक शिवस्वराज्य

शेवटच्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध.. मंत्री गिरीष महाजन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील माता भगिनींच्या सोयीसाठी दि.७ रविवार रोजी पाचोरा रोड माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर तसेच माननीय जितेंद्र पाटील यांच्या कार्यालयात येथे "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" नोंदणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत अतिशय अल्पकालावधीत नियोजन करण्यात आलेल्या या शिबीराला प्रचंड असा प्रतिसाद लाभला.  योजनेचे अर्ज भरून घेणे व मार्गदर्शन करणे, पुरवठा विभागामार्फत आवश्यक असेल त्यांना रेशनकार्डमध्ये नाव कमी जास्त करून देणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. येणाऱ्या लाभार्थी महिलांना मोफत अर्ज तसेच कागदपत्रे झेरॉक्स देखील मोफत देण्यात येत होते. सांगितले की, राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी योजना म्हणून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" भाजपा महायुती सरकारने सुरू केली आहे, या योजनेमुळे कुटुंब सांभाळणाऱ्या माता भगिनींना दरमहा १५०० रुपये अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार आहे. मंत्री गिरीश महाजन इतर लोकप्रतिनिधी यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे योजनेची वयोमर्यादा ६० वरून ६५, उत्पन्न दाखल्याला रेशनकार्ड तसेच डोमीसाईल ला मतदानकार्ड / जन्मदाखल्याचा पर्याय देण्यात आल्यामुळे बहिणींना कमीत कमी कागदपत्रे लागणार आहेत. तरीदेखील बऱ्याच बहिणींची नावे रेशनकार्ड मध्ये नसल्याने या शिबिराच्या माध्यमातून ती अडचण देखील दूर केली जाईल तसेच योजना संदर्भातील ईतर अडचणी देखील सोडविल्या जातील. जामनेर तालुक्यातील शेवटच्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देईपर्यंत शिबीर तसेच आमदार कार्यालयाच्या माध्यमातून हे नोंदणी अभियान सुरू राहील अशी शाश्वती यानिमित्ताने मंत्री महोदय यांनी  दिली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads