फोटोग्राफी दिनानिमित्त जामनेरमध्ये छायाचित्रकारांचा उत्साह... - दैनिक शिवस्वराज्य

फोटोग्राफी दिनानिमित्त जामनेरमध्ये छायाचित्रकारांचा उत्साह...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर 19 ऑगस्ट 2024 रोजी जामनेर शहरात जागतिक फोटोग्राफी दिन मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त शहरातील अनेक नामांकित फोटोग्राफर्सनी एकत्र येत आपली कला सादर केली.कार्यक्रमाचे आयोजन छायाचित्रकार अरुण बेलपत्रे, मनोज दुसाने, शशी पाटील, आबा पाटील आणि त्यांच्या टीमने केले होते. या निमित्ताने, विविध प्रकारच्या छायाचित्रण कौशल्यांचे आदानप्रदान आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संदीप पाटील, पवन साळुंके, गोपाल माळी, गणेश सावळे, शांताराम झाल्टे,अमोल मराठे यांसारख्या अनुभवी फोटोग्राफर्सनी आपले अनुभव आणि ज्ञान शेअर केले.कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थित फोटोग्राफर्सनी त्यांच्या कॅमेरामध्ये विविध क्षण टिपून केली. जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून सर्व छायाचित्रकारांनी आपल्या कला कौशल्याचे प्रदर्शन करत जामनेर शहरात हा विशेष दिवस उत्साहात साजरा केला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads