अवैध गौणखनिज प्रकरण.. जामनेरमध्ये 19 सप्टेंबरला स्थावर मालमत्तेचा लिलाव
जळगाव, दि. 21: जामनेर तालुक्यातील वाघारी गावातील धर्मराज शशीकांत पाटील यांच्या मालकीचे गट क्र. 24/2, क्षेत्रफळ 1.80 हेक्टर पैकी अविभाज्य स्थावर मालमत्ता, शासनाने अवैध गौणखनिज दंड न भरल्यामुळे जप्त केली आहे. या दंडाच्या वसुलीसाठी तहसिल कार्यालय, जामनेर येथे 19 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता या मालमत्तेचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.तहसिलदार कार्यालयाच्या सूचनेनुसार, ज्यांना ही मालमत्ता खरेदी करायची आहे, त्यांनी 17 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने पार पाडली जाईल.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा