नेपाळ बस दुर्घटनेतील २३ भाविकांना सावदा येथे भावपूर्ण श्रद्धांजली - दैनिक शिवस्वराज्य

नेपाळ बस दुर्घटनेतील २३ भाविकांना सावदा येथे भावपूर्ण श्रद्धांजली

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
दी. २३ ऑगस्ट हा दिवस जळगाव जिल्ह्यासाठी तसेच संपूर्ण देशासाठी काळादिवस ठरला आहे. देवदर्शनासाठी नेपाळला निघालेल्या २३ भाविकांच्या बसला झालेल्या दुर्घटनेत, त्यांचे दुःखद निधन झाले. या घटनेने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.सावदा येथे मृत्युमुखी पावलेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख ना. बच्चूभाऊ कडू, प्रहार जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, विलास पांडे, गणेश बोरसे, हर्षा अनिल चौधरी, हाजी हकीम खाटिक, धीरज अनिल चौधरी, अॅड. नंदिनी अनिल चौधरी, आणि अनिल छबिलदास चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी आपल्या भाविकांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या आत्म्याला ईश्वर चरणी शांती लाभो अशी प्रार्थना केली.कार्यक्रमाच्या अखेरीस, उपस्थितांनी या दुर्घटनेबद्दल आपला शोक व्यक्त केला आणि या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आधार देण्याची विनंती केली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads