महाराष्ट्र
समीर शेख प्रतिनाधी
लोकनेते कै. बाबुराव अण्णा पाटील सर्वांगीण विकास प्रशाला वडापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न...
सोलापूर (मंद्रूप) : सोलापूर जिल्हा बाल विकास समिती संचलित लोकनेते कै. बाबुराव (अण्णा) पाटील सर्वांगीण विकास प्रशाला,वडापूर येथे भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गावामध्ये देशभक्तीपर तसेच स्वच्छते वरती आधारित घोषणा देत गावामध्ये प्रभात फेरी काढून केली.
त्यानंतर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर पुजारी, प्रमुख पाहुणे गौरप्पा पुजारी, पत्रकार समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान संस्थेचे सचिव दर्शनजी वाघचवरे व खजिनदार ज्ञानदेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य शबाना तांबोळी व संजय पारसे यांच्या उपस्थितीत संपूर्ण ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त साधून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन प्रशालेतील विद्यार्थी, पालक तसेच उपस्थित ग्रामस्थांसमोर उत्स्फूर्तपणे सादर केले. यामध्ये स्वातंत्र्यवीरांना मानवंदना म्हणून इयत्ता आठवी, नववी, दहावी मधील मुला मुलींनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादरीकरण करून देशभक्ती जागृत केली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून देशभक्तांच्या बलिदानाचे, स्वातंत्र्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले.
दिनांक 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत प्रशालेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेमार्फत बक्षीस वितरण करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रशालेचे मुख्याध्यापक औदुंबर बंडगर, सहशिक्षक ज्ञानेश्वर पवार आणि सहशिक्षक संतोष भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी देशप्रेम शिस्त याचे महत्त्व पटवून देताना पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली तसेच संस्थेमार्फत प्रशालेत राबविण्यात आलेले विकास कामांचे व विविध उपक्रमांची सविस्तर माहिती सर्वांसमोर सादर केली.
तसेच संस्थेचे मुख्य सचिव दर्शनजी वाघचवरे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून हा कार्यक्रम अपूर्ण मनुष्यबळ असताना देखील व्यवस्थित व यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल प्रशालेतील विद्यार्थ्यांचे शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ यांची विशेष प्रशंसा केली तसेच विद्यार्थ्यांचे व प्रशालेचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थित असलेले विद्यार्थी पालक प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांचे आभार मानले.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या सांगता दरम्यान वडापूर गावचे प्रथम नागरिक तसेच गावचे उपसरपंच सविताताई वाघचवरे यांनी प्रशालेत त्यांची उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम चांगल्या रीतीने राबवल्याबद्दल संस्थेचे व प्रशालेतील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमानंतर संस्थेमार्फत व प्रशालेमार्फत विद्यार्थांना व उपस्थित मान्यवरांना अल्पोपहार व खाऊ वाटप करण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा