वैज्ञानिक अधिकारी श्रीमती.मनिषा भास्कर वाकोडे/इंगळे सन्मानित ... - दैनिक शिवस्वराज्य

वैज्ञानिक अधिकारी श्रीमती.मनिषा भास्कर वाकोडे/इंगळे सन्मानित ...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सहसंचालक कार्यालय, नाशिक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, फत्तेपूर  येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती.मनिषा भास्कर वाकोडे/इंगळे यांना राष्ट्रीय किकटजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या वर्षामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने सन्माणीत केले.
तसेच प्रयोगशाळेत होणाऱ्या शरीरातील रक्ताचे प्रमाण तपासणी, रक्तातील साखर,एच आय व्ही , मलेरिया तपासणी, रक्तातील पांढरा कावीळ तपासणी, लघवीमधून गर्भधारणा तपासणी, या सर्वांच्या अचुक तपासानी कार्याची दखल घेत आरोग्य सेवा नाशिक विभागातुन प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श कर्मचारी तृतीय पुरस्काराने सन्माणीत करण्यात आले.
मा. श्री. डॉ.कपील आहेर सर, उपसंचालक आणि मा. श्री. डॉ.विवेक खतगांवकर सर, सहाय्यक संचालक ( हिवताप ), आरोग्य सेवा, नाशिक विभाग यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 जामनेर शहरात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ.योगेश इंगळे यांच्या पत्नी आहेत.मनिषा प्राथमिक आरोग्य केंद्र, फत्तेपूर, ता.जामनेर, जि. जळगाव येथे कार्यरत आहेत.श्रीमती.मनिषा यांना मिळालेल्या या यशामध्ये घरातील सर्व सदस्य, त्यांचे पती डॉ.योगेश, तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख सर, श्री.महेंद्रसिंग पाटील सर, इतर सर्व कर्मचारी वृंद, जळगाव जिल्हा हिवताप कार्यालय, तसेच जामनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत मॅडम, डॉ.संदिप जाधव सर, डॉ.शारेक काद्री सर, तसेच इतर सर्वच कर्मचारी वृंद या सर्वांचेच खुप मोठे योगदान आहे. या सर्वांनी वेळोवेळी केलेले सहकार्य, मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाले.असे मनीषा यांनी यावेळी सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads