जामनेरमध्ये मुस्लिम कब्रिस्तान संरक्षण भिंतीच्या कामाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भुमिपूजन; सर्वसमावेशक प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध
आज जामनेर शहरातील मुस्लिम कब्रिस्तानाच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भुमिपूजन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या समारंभात जामनेरच्या विविध भागातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.भुमिपूजनाच्या वेळी मंत्री महाजन यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना महायुती सरकार सर्वसमाजाच्या उन्नतीसाठी आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, “प्रत्येक समाजाच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. हा प्रकल्प जामनेर शहराच्या विकासात एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल आणि समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरेल.
कार्यक्रमात स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, कारण संरक्षण भिंतीचे काम शहराच्या सुरक्षा आणि शांतीसाठी महत्त्वाचे ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती, आणि या प्रकल्पामुळे जामनेर शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा