मंत्री गिरीश महाजनांचे विरोधकांवर टीकास्त्र: 'लखपती दीदी' मेळाव्याच्या यशासाठी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यांचा उल्लेख..
जळगाव (दि. २२) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्ट रोजी जळगाव विमानतळाच्या समोरच्या प्राईम औद्योगिक वसाहतीत 'लखपती दीदी' या राज्यस्तरीय ऐतिहासिक महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
महाजन यांनी महिलांच्या बचत गटांच्या यशोगाथा सांगितल्या, ज्यात अनेक महिलांनी लखपती होण्याची यशस्वी कहाणी दर्शविली आहे. केंद्र व राज्याने दिलेल्या संधींचा लाभ घेत महिला बचत गटांनी नियमितपणे कर्ज परत केले आहे. 'लाडकी बहिण' योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाजन यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली आणि विरोधकांच्या विकासविरोधी आरोपांवर प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न चालवले आहेत, पण केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासात्मक कार्यांचे योग्य उत्तर देण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आमदार राजू मामा भोळे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, उज्वलाताई बेंडाळे, ज्ञानेश्वर जळकेकर, माजी खासदार उल्हास पाटील, राधेश्याम चौधरी, केतकी पाटील, डॉक्टर राजेंद्र फडके, अजय भोळे, देवयानी ठाकरे, अशोक कांडेलकर, माजी महापौर भारतीताई सोनवणे, ज्योती निंभोरे, वैशाली कुलकर्णी, महेश जोशी, रेखा कुलकर्णी, संगीता गवळी, सचिन पानपाटील, राकेश पाटील, हिरालाल कोळी, रेखा वर्मा, प्रसिद्धी प्रमुख मुविकोराज कोल्हे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा