जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान, गोरनाळे गावातील कपाशी पिक पाण्याखाली..
जामनेर तालुक्यातील गोरनाळे गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी उमेश राजाराम पाटील यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाण्याचा जोर इतका होता की शेतातील कपाशी पिक पूर्णपणे जमिनीवर आडवी पडली आहे. या मुसळधार पावसामुळे कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, पिकांची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता आहे.तालुक्यातील इतर भागांमध्येही अशीच स्थिती असून, अनेक शेतकरी या पावसामुळे हवालदिल झाले आहेत. शेतात पाणी साचल्याने पीक कुजण्याची भीती आहे आणि परिणामी, शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानात मोठी भर पडणार आहे.स्थानिक प्रशासनाने तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. तसेच, शासनानेही या परिस्थितीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी योग्य ती पावले उचलावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा