मंद्रूप पोलीस स्टेशनची दमदार कारवाई ;गुटखा वाहतुक करणारे दोन आरोपी व वाहन ताब्यात, एकुण ७,२६,०००/- रू चा मुद्देमाल हस्तगत... - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रूप पोलीस स्टेशनची दमदार कारवाई ;गुटखा वाहतुक करणारे दोन आरोपी व वाहन ताब्यात, एकुण ७,२६,०००/- रू चा मुद्देमाल हस्तगत...


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप) : पोलीस अधीक्षक सोलापुर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी सोलापुर ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आगामी सणउत्सव व विधानसभा निवडणुक चे अनुषंगाने अवैध धंदयावर कारवाई करण्या बाबत आदेशीत केले होते.
  पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने मंद्रुप पोलीस ठाणे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करण्या बाबत सुचना देण्यात आले होते.
   त्या अनुषंगाने दिनांक २४ ऑगस्ट रोजी रात्री पोलीस कॉन्स्टेबल रोहन पवार, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल महांतेश मुळजे यांना पोलीस ठाणे हद्दीत हायवे पेट्रोलींग ड्युटी नेमण्यात आली होती सदर अंमलदार हे रात्रीचे सुमारास महामार्गावर सरकारी वाहनाने हायवे पेट्रोलींग करत असताना त्यांना बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली कि, एका वाहन विजापुर कडुन सोलापुर कडे अवैध गुटखा वाहतुक करीत येत असल्याची बातमी मिळताच सदर अंमलदार हे तात्काळ नांदणी टोल नाका येथे पहाटेचे सुमारास जावुन थाबले थोडया वेळाने बातमीप्रमाणे सदरचे वाहन विजापुरचे दिशेने येत असल्याचे दिसले सदर वाहनास ड्युटीवरील अंमलदार यांनी हाताचा इशारा करून थांबविले सदर वाहनाची तपासणी करता त्यामध्ये २१ पांढ-या रंगाचे गोण्यामध्ये १२६०००/- रू किमंतीचा हिरवा गुटखा नावाचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला मिळुन आला वाहन चालक व त्यासोबत असलेल्या इसमास नांव गांव विचारता त्यांनी चालक, सोहेल मुर्तुज कुरेशी वय २३ वर्षे रा. कुरेशी गल्ली हजी माही चौक सोलापुर व त्याचा साथीदार अकील मोहम्मद सलीम शेख वय ३२ वर्षे, रा. जोडभावी पेठ मंगळवार बाजार सोलापुर असे असल्याचे सांगीतले सदर वाहन व मिळुन आलेले दोन इसम यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन तात्काळ सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन विभाग सोलापुर यांना कळविण्यात आले त्याप्रमाणे अन्न व सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी सदर वाहनाची व त्यामधील प्रतिबंधीत हिरवा गुटखा मालाची तपासणी करून ६०००००/- रू किमंतीचे टाटा पंच एम.एच.१३ इ.सी.८३९३ ग्रे कलर व १२६०००/-रू किमंतीचा हिवरा गुटखा असे एकुण ७,२६,०००/- रू किमंतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करून वरील दोन इसमाविरूध्द मंद्रुप पोलीस ठाणेस अन्न व सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीस न्याय संहीता कलम २२३, २७४, २७५, १२३ व अन्न सुरक्षा व मानदे का. कलम २६ (२), २६(२)(i), २६(२)(ii) २६(२)(iv), २७(३)(E), ३०(२)(A) ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
     वरील दोन आरोपी यांना गुन्हयाचे तपास कामी अटक करण्यात आली असुन मा. न्यायालयात हजर केले असता गुन्हयातील आरोपीतांना दिनांक २८ ऑगस्ट पर्यत ०४ दिवस पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक राजु डांगे, मंद्रुप पोलीस ठाणे हे करत आहेत.
     सदरची कामगीरी हि पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापुर विभाग संकेत देवळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार मंद्रुप पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे, पोलीस अंमलदार अंकुश मोरे, रोहन पवार, दिनेश पवार व महांतेश मुळजे यांनी बजावली आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads