बदलापूर येथे घडलेल्या घटनेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचा संताप, कठोर कारवाईचे आश्वासन - दैनिक शिवस्वराज्य

बदलापूर येथे घडलेल्या घटनेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचा संताप, कठोर कारवाईचे आश्वासन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
बदलापूर येथे एका चिमुकल्या मुलींसोबत घडलेल्या अमानुष घटनेनंतर राज्यातील जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या भावना अत्यंत दुखावल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूरला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.गिरीश महाजन यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून नराधमांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत ते म्हणाले, "सरकार या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या घटनेचा तपास योग्य पद्धतीने आणि जलदगतीने होण्यासाठी आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे."
याशिवाय, या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "नागरिकांना भावनिक होण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी कायदा हातात घेऊ नये," असे आवाहन गिरीश महाजन यांनी संतप्त नागरिकांना केले. सरकार दोषींना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे कठोर शिक्षा देईल याची ग्वाही देत त्यांनी लोकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads