जळगावातील 'लखपती दीदी' महिला मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा; महिला सुविधांसाठी तंतोतंत नियोजनाच्या सूचना - दैनिक शिवस्वराज्य

जळगावातील 'लखपती दीदी' महिला मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा; महिला सुविधांसाठी तंतोतंत नियोजनाच्या सूचना

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव, दि. 20  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 25 ऑगस्ट रोजी जळगाव येथे होणाऱ्या 'लखपती दीदी' या ऐतिहासिक महिला मेळाव्यासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांनी आढावा बैठक घेतली. महिलांच्या जेवण, पाणी, आणि स्वच्छतागृह व्यवस्थेसाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही मेळाव्याच्या तयारीची सविस्तर माहिती सादर केली. कार्यक्रम स्थळाच्या पाहणी दरम्यान, पार्किंग व्यवस्थापनावर अलर्ट राहण्याचे निर्देश देत रक्षाताई खडसे यांनी पोलिस आणि महापालिकेच्या समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, कार्यक्रमस्थळी बॅग आणि पाण्याच्या बाटल्या न आणण्याबाबत सूचना दिल्या असून, प्रत्येक बसला क्रमांक देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads