जामनेर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते
जामनेर विधानसभा मतदारसंघातील निमखेडी पिंप्री, फत्तेपूर आणि तोंडापुर या गावांमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज माननीय मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. या विकास कामांच्या माध्यमातून परिसरातील विकासात मोठी भर पडणार आहे.मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "लोकार्पण झालेल्या आणि भूमिपूजन करण्यात आलेल्या सर्व कामे जलद गतीने आणि उच्च दर्जाची व्हावीत यासाठी मी कटिबद्ध आहे." त्यांनी या कामांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमात स्थानिक जनप्रतिनिधी, नागरिक, आणि संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकास कामांमुळे परिसरातील नागरी सुविधांमध्ये वाढ होणार असून, नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.शासनाच्या पुढाकाराने या विकास कामांचा लाभ हा स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात मिळेल आणि या भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल,असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा