चिंचखेडा तवा आणि ढालगाव येथील तडवी समाजातील १९० तरुणांचा BJP पक्षात प्रवेश... - दैनिक शिवस्वराज्य

चिंचखेडा तवा आणि ढालगाव येथील तडवी समाजातील १९० तरुणांचा BJP पक्षात प्रवेश...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
आज तोंडापूर जिप गटातील चिंचखेडा तवा आणि ढालगाव येथील तडवी समाजातील १९० तरुणांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. या सोहळ्यात मा. संजयदादा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे मा. मंत्री गिरीष भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये सामील झाले. यावेळी स्नेहदीपभाऊ संजयराव गरुड, विलास भाऊ राजपूत, जे.के. चव्हाण आणि परिसरातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 
तरुणांचा हा उत्साही प्रवेश भाजपा पक्षाची ताकद वाढविण्याचा आणि समाजाच्या विविध घटकांशी संवाद साधण्याचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads