जामनेर येथील संदीप वाघ यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 'संयोगी अध्यापक योजना' अंतर्गत फेलोशिप मंजूर
जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळा विभागातील पीएच.डी. करत असलेल्या जामनेर येथील संदीप भाऊराव वाघ यांना विद्यापीठाच्या 'संयोगी अध्यापक योजना' अंतर्गत फेलोशिप मिळाली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून संदीप वाघ विद्यापीठात पूर्णवेळ संशोधन कार्य आणि अध्यापनाचे कार्य करणार आहेत. याशिवाय, विद्यापीठातील विविध प्रकल्प आणि योजनांमध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. ही योजना तीन वर्षांसाठी आहे, ज्यामुळे त्यांना आपल्या संशोधनात अधिकाधिक समर्पणाने काम करण्याची संधी मिळणार आहे.
संदीप वाघ यांना फेलोशिप मिळविण्यासाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीषा इंदानी, प्रा. डॉ. संतोष खिराडे आणि अरुणोदय महिला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संदीप वाघ यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा