जामनेर तालुक्यातील केळीच्या बागेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गावात संतापाची लाट
जामनेर तालुक्यातील एका गावात बुधवारी, २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १०:३० वाजेच्या सुमारास एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह गावातच राहते. तिचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. बुधवारी सकाळी पीडित मुलगी शौचास गेली असता गावातील संशयित आरोपी अजय सुनील भिल (वय अंदाजे १८ ते २१ वर्षे) याने तिला शौचालयाजवळ पकडले आणि बळजबरीने जवळच्याच केळीच्या बागेत नेले. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.घरी परतल्यानंतर पीडित मुलीने हा भयानक अनुभव तिच्या आईला सांगितला, त्यानंतर तिच्या आईने तात्काळ जामनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. पोलीसांनी त्वरित कारवाई करत आरोपी अजय सुनील भिल याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे करत आहेत. अत्याचाराच्या या भयानक घटनेने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. आरोपीला त्वरित कडक शासन होण्याची मागणी जोर धरत आहे. बलात्काराच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने अनेक कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत, मात्र अशा घटनांचा वारंवार पुनरावृत्ती होत असल्याने समाजात चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून कठोर कारवाईची अपेक्षा असताना, गावकऱ्यांनी अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक सुरक्षा आणि जागरूकता मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा