जामनेर शहरात दहीहंडी उत्सव सुरू: मोठ्या उत्साहात जनसागर जमला - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर शहरात दहीहंडी उत्सव सुरू: मोठ्या उत्साहात जनसागर जमला

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर शहरात दहीहंडी उत्सवाची धूम सुरू झाली आहे. शहरातील नागरिक, लहान मुले, युवक, मोठ्या उत्साहाने या पारंपरिक सणात सहभागी झाले आहेत. 
माननीय गिरीशभाऊ महाजन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध कलाकार आणि मान्यवर व्यक्ती उपस्थित आहेत. या वर्षीचा दहीहंडी उत्सव अधिक भव्य आणि आकर्षक करण्यासाठी आयोजकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचीही व्यवस्था केली आहे. शहरातील मुख्य चौकात मोठा जनसागर जमलेला असून, संगीताच्या तालावर गोविंदा पथकं उत्साहात आहे.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अभिनेती प्रार्थना बेहरे, यांची उपस्थिती. दहीहंडीचा थर रचताना गोविंदांच्या टीमने आपले कौशल्य दाखवले. प्रत्येक थराच्या उभारणीसाठी त्यांनी घेतलेला मेहनत आणि जोश शहरातील नागरिकांसाठी एक विशेष अनुभव देत आहे. संपूर्ण कार्यक्रम सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आयोजित करण्यात आला आहे, आणि पोलीस बंदोबस्तही पुरेसा ठेवण्यात आला आहे. 


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads