वाकोदच्या सरपंच सरला सपकाळे अपात्र..विभागीय आयुक्तांचे आदेश
जामनेर तालुक्यातील वाकोद येथील सरपंच सरला संजय सपकाळे यांना उपसरपंचपद भरण्यात कर्तव्य कसूर केल्याने सरपंचपदावरून अपात्र करण्यात आल्याचा निकाल विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी काढला आहे. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.वाकोद ग्रामपंचायतीचे ११ सदस्य अपात्र संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील काही अर्ज मंजूर होऊन काही अर्ज अद्याप निकालासाठी बाकी होते. त्यानुसार काही सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, उपसरपंच रविंद्र भगत यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २९ मे २०२३ रोजी पदावरून अपात्र केले होते. तेंव्हा पासून उपसरपंचपद रिक्त होते. नियमांनुसार ३० दिवसांच्या आत उपसरपंच पदाचे रिक्तपद भरण्याचे आवश्यक असताना सरपंच सरला सपकाळे यांनी कर्तव्यात कसूर केल्याने गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेले उपसरपंचपद भरलेले नाही. याला सरपंच सरला सपकाळे हे जबाबदार असल्याचे ठरवून अपात्र करावे असा अहवाल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला. या अहवालाचे अवलोकन केल्यानंतर नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी सरपंच सरला संजय सपकाळे यांना अपात्र करण्याचा निकाल दिला आहे.मुख्य तक्रार अर्चना दीपक गायकवाड हे आहेत, त्यांच्यातर्फे अॅड. विश्वासराव भोसलें यांनी काम पाहिले. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा