महाराष्ट्र
दक्षिण सोलापूर फोटोग्राफर असोसिएशन व ड्रीम फाऊडेशन कडून उत्कृष्ट छायाचित्रकारांचा सन्मान...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर फोटोग्राफर असोसिएशन व ड्रीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिनाच्या औचित्याने उत्कृष्ट छाया चित्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सालाबादप्रमाणे जागतिक छायाचित्रकार दिनाच्या निमित्ताने
फोटोग्राफर बंधू यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी ब्रिजमोहन फोफलिया सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शक ,डॉ श्रीकांत अंजुठगी प्रेरणादायी वक्ते प्रशिक्षक यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील किरण सलोटगी - किरण फोटो स्टुडिओ भंडारकवठे,महिबूब पाटील - तबसूम फोटो स्टुडीओ कुडल, वैजिनाथ सगरे - वसुंधरा फोटो स्टुडिओ बंकलगी,विजयकुमार स्वामी- मलिकार्जुन फोटो स्टुडिओ कारकल,महादेव मारुती जाधव समर्थ फोटो स्टुडिओ कासेगाव,महम्मद अलाउद्दीन पठाण- राज फोटो स्टुडिओ उळे,अमर फोटो स्टुडिओ-महादेव नागप्पा शिवशेट्टी संगदरी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून उत्कृष्ट छायाचित्रकार २०२४ चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी संयोजक काशिनाथ भतगुणकी संस्थापक ड्रीम फाउडेशन सोलापूर , अशोक सोनकंटले अध्यक्ष दक्षिण सोलापूर फोटोग्राफर असोसिएशन, उपाध्यक्ष प्रकाश सुतार व गौरव राठोड, तुकाराम शेंडगे,रायप्पा कुंभार,मल्लिकार्जुन काळे, रेवणसिद्द काळे,संजय गायकवाड आदी फोटोग्राफर बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. व तसेच यावेळी डॉ.श्रीकांत अंजुठगी, ब्रिजमोहन फोफलिया,तुकाराम शेंडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन काशिनाथ भतगुणकी यांनी तर आभार अशोक सोनकंटले यांनी मानले.
Previous article
Next article
एकदम मस्त सर जी बातमी
उत्तर द्याहटवा