नेरी बद्रुक येथे रक्षाबंधन निमित्त राहुलरॉय मुळे यांच्याकडून दिव्यांग माता भगिनींना साडी-शॉल वाटप... - दैनिक शिवस्वराज्य

नेरी बद्रुक येथे रक्षाबंधन निमित्त राहुलरॉय मुळे यांच्याकडून दिव्यांग माता भगिनींना साडी-शॉल वाटप...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
नेरी बद्रुक येथे रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त राहुलरॉय मुळे यांच्या वतीने दिव्यांग माता आणि भगिनींना साडी, शॉल, पेढे, आणि बिस्कीट वाटप करून सण उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पवनभाऊ वाघ, चेतनभाऊ निंबाळे, पवन नवतुरे, आणि संदीपभाऊ गुजर उपस्थित होते. दिव्यांग माता भगिनींचे प्रतिनिधित्व यमुनाताई कुमावत यांनी केले.कार्यक्रमात राहुलरॉय मुळे यांनी पुढील वेळी दिव्यांग महिलांना किराणा साहित्य देखील देण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे सामाजिक बंधन आणखी दृढ झाले असून, "नाते तुमचे आमचे, सामाजिक बंधनाचे" या सूत्राचे महत्त्व अधोरेखित केले गेले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads