जामनेर तालुक्यातील शाळांनी बदलापूर येथील अत्याचार प्रकरणातून धडा घ्यावा - मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील शाळांनी बदलापूर येथील अत्याचार प्रकरणातून धडा घ्यावा - मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
23 ऑगस्ट रोजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांना निवेदन सादर केले. राजसाहेब ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार, जळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन गट शिक्षण विस्तार अधिकारी काळे साहेब यांच्याकडे सादर करण्यात आले.
या निवेदनात, प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या, विशेषत: मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सफाई कर्मचारी, आणि मुलींना ने-आण करणाऱ्या स्कूल बसेसच्या सुरक्षिततेबाबत देखील विशेष लक्ष दिले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 
मनसेच्या वतीने जामनेर न्यू इंग्लिश स्कूल, इंदिराबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, आणि एकलव्य प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना हे निवेदन सादर करण्यात आले. 
तालुक्यातील सर्व शाळांनी एका महिन्याच्या आत या निवेदनात नमूद केलेल्या सूचनांवर कितपत अंमलबजावणी केली, याची पाहणी व चौकशी करण्यात येईल, असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads