जळगावात लखपती दीदींच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला येणार .... - दैनिक शिवस्वराज्य

जळगावात लखपती दीदींच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला येणार ....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 25 ऑगस्टला पंतप्रधानांचा   लखपती दीदी ' हा ऐतिहासिक मेळावा जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सहायक सचिव, जिल्हाधिकारी यांच्यासह  जागेची पाहणी करण्यात आली.
सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय 'लखपती दीदी' हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वाती शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाचे अधिकारी यावेळी उवस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads