जामनेर येथील सामजिक कार्यकर्ते रऊफ शेख यांची समाजवादी पक्षाच्या जामनेर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती...
जामनेर येथील सामजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ,शेख महेमुद यांची समाजवादी पक्षाच्या जामनेर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून महानगर अध्यक्ष रिजवान जहागीरदार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू, व सामाजिक कार्यकर्ते,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तब्बल 15 वर्षे काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा सचिव,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष,तसेच काँग्रेस शहर उपाध्यक्ष अश्या महत्वाच्या पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळलेली आहे.तसेच गोरगरिबांच्या अडीअडचणी च्या प्रसंगी धाऊन जाणारे व्यक्तिमत्त्व,तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांची संजय गांधी निराधार योजना,तसेच शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या योजनांचा गोरगरिबांना लाभ मिळवून देण्याचे काम स्वयं खर्चाने करून देणारे होतकरू नेतृत्व म्हणून संपूर्ण तालुक्यात सर्वश्रुत असलेले रऊफ भाई शेख यांच्या समाजसेवेची दखल घेऊन आज (दि.18) रोजी जळगांव जिल्हा महानगर अध्यक्ष~रिजवान जहागीरदार यांनी  जामनेर त्यांची तालुका अध्यक्ष पदी निवड केली. जामनेर येथील आयोजित बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे.यावेळी तालुका उपाध्यक्ष~रफिक बशीर शहा. तालुका सचिव~मुखतार शे.अकबर.
खजिनदार~जाकीर सायबु बागवान.
सदस्य~शे. रईस लुकमान,साबीर शे.बशीर, हमीद शे.फरीद,शे.सलीम शे.युसूफ, जहीर खान कय्युम खान,अबुजर शे.हनिफ या सर्वांची समाजवादी पक्षाच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यात प्रथमच जामनेर तालुक्यातून समाजवादी पक्षाने पदार्पण केले आहे.रऊफ शेख यांच्या समाजवादी पक्षाच्या जामनेर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याने तालुक्यातील राजकीय गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.रऊफ शेख यांची निवड झाल्याने त्यांच्यावर शहरासह संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा