जळगावसह मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा: हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा - दैनिक शिवस्वराज्य

जळगावसह मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा: हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. नागरिकांनी या वातावरणात बाहेर पडताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने या परिस्थितीसाठी विशेष सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे.या वातावरणात नागरिकांनी घरोबाहेर न पडणे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे, आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी विजेच्या उपकरणांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. हवामानात तातडीने बदल होण्याची शक्यता असल्याने सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads