खडकी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या मोहन सूर्यवंशीसाठी SDRF शोधकार्य सुरु...
जामनेर तालुक्यातील शहापूर येथील मोहन पंडित सूर्यवंशी (वय ४० वर्ष) खडकी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तहसीलदारांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी सर यांचे नेतृत्वाखाली SDRF (स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स) टीमने घटनास्थळी शोधकार्य सुरु केले.
अंधारामुळे शोधकार्य थांबवले गेले असून, SDRF टीमच्या एका पथकाला भुसावळ येथे रवाना करण्यात आले आहे. तसेच, मौजे पहुर येथील कुमावत मंगल कार्यालयात SDRF टीमसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था सुनिश्चित केली आहे. उपविभागीय अधिकारी श्री गोसावी यांनी पहुर येथे भेट देऊन या व्यवस्थेची पाहणी केली आहे.
सकाळी SDRF टीमच्या सहाय्याने शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भातील नवीन माहिती मिळाल्यानंतर तात्काळ अपडेट देण्यात येईल.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा