जळगाव नजीक अवैध खैर साठ्यावर वन विभागाची धाड; 680 नग खैर लाकूड हस्तगत
जळगाव: दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी विभागीय वनाधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे अवैध खैर साठ्यावर कारवाई करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी गस्तीपथक जळगाव व प्रादेशिक अधिकारी जळगाव यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबा शिवार, जळगाव शहराजवळ धाड टाकण्यात आली, ज्यात खैर प्रजातीच्या 680 नग लाकडाची जप्ती करण्यात आली. या लाकडांची अंदाजे किंमत ₹1,75,000/- इतकी आहे.सदर साठा अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथील खैर व्यापारी हसरत खान साहेब खान कुरेशी उर्फ बाबा कुरेशी यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या कारवाईचे मार्गदर्शन वनसंरक्षक धुळे श्रीमती निनू सोमराज, उपवनसंरक्षक जळगाव श्री प्रवीण ए., विभागीय वन अधिकारी दक्षता श्री राजेंद्र सदगीर, व सहाय्यक वनसंरक्षक जळगाव श्री उमेश बिराजदार यांनी केले. गस्तीपथकाचे प्रमुख श्री सचिन जाधव (वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्तीपथक जळगाव), श्री नितीन बोरकर (वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक जळगाव), श्री संदीप पाटील (वनपाल, जळगाव), श्री योगेश दीक्षित (गोपाल गस्तीपथक), श्री भरत पवार (वनपाल, विटनेर), श्री भागवत तेली (वनरक्षक, गस्तीपथक), श्री दीपक पाटील (वनरक्षक), श्री हरीश थोरात (वनरक्षक), श्री अजय रायसिंग (वनरक्षक), श्री विलास पाटील (वनरक्षक), आणि श्री गुलाब सिंह ठाकरे (वनरक्षक) यांच्या सहभागाने ही धाड यशस्वी करण्यात आली.
वन विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वृक्षतोडीवर आळा बसणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा