जामनेर.. वाघूर नदीच्या पुरामुळे हीवरी दिगर गावात हाहाकार; अनेकांचे घर पाण्यात तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त
जामनेर तालुक्यातील हीवरी दिगर गावात वाघूर नदीला आलेल्या पुरामुळे गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरले असून, गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला प्रचंड पूर आला असून, या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त ग्रामस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: गुलाब चंदू तडवी, अलादीन रमजान टुडे, अजीत युसूफ तडवी, सांडू हिदायत तडवी, छोटू शमशेर तडवी, हामिद नुराब तडवी, राशिद फकीरा तडवी, सलमान बशीर तडवी, मंसौर जफर तडवी आणि मूसा जफर तडवी.
गावातील अनेक कुटुंबे या पुरामुळे उघड्यावर आली आहेत, आणि त्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने मदत करावी तसेच पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.
दरम्यान, पहूर बाजारपेठेतही पुराचे पाणी घुसल्याने अनेक टपरी दुकाने आणि हातगाड्या वाहून गेल्याची माहिती आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. प्रशासनाने या परिस्थितीचा आढावा घेत पूरग्रस्तांना तात्काळ मदत पुरवावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा