जामनेर शहरातील विशाल लॉन्सवर फोटोग्राफर बांधवांच्या स्नेहसंमेलनाची धूम....
आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी जामनेर तालुक्यातील सर्व फोटोग्राफर बांधवांनी एक आगळावेगळा स्नेहसंमेलन कार्यक्रम 'विशाल लॉन्स' येथे आयोजित केला. कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व फोटोग्राफर आपल्या परिवारासहित उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व फोटोग्राफर बांधवांनी आपला परिचय दिल्याने झाली. त्यांनी आपल्या फोटोग्राफी क्षेत्रातील चांगले वाईट अनुभव सहभागींसोबत शेअर केले. महिलांसाठी संगीत खुर्ची आणि लहान मुलांसाठी डान्स प्रोग्राम आयोजित करण्यात आला.
यानंतर, सर्व फोटोग्राफर बांधवांनी आणि महिलांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 'विशाल लॉन्स' चे मालक संचालक डी एन चौधरी दादांनी फोटोग्राफर बांधवांसाठी लॉन्स मोफत उपलब्ध करून दिले. 'विशाल लॉन्स' च्या सर्व कर्मचाऱ्यांनी देखील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले गेले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा