आघाडीतील कोणीही चालेल मात्र आयात उमेदवार चालणार नाही: व्ही. पी. पाटील यांची ठाम भूमिका
जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला (दिलीप खोडपे सर)यांना उमेदवारी दिल्यास, असा उमेदवार आम्हाला चालणार नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष व्ही. पी. पाटील (सर) यांनी मांडले आहे. आज (११ सप्टेंबर) बुधवार, दुपारी चार वाजता शिक्षक कॉलनी येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सध्या जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपचे दिलीप खोडपे यांना उमेदवारी देण्यासाठी विचार करत आहे, अशी माझी माहिती आहे, असे ते म्हणाले. जर त्यांना उमेदवारी दिली गेली, तर गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या आमच्या कार्यकर्त्यांचे काय? पाटील पुढे म्हणाले, आमच्यातही अनेक चांगले, एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, जे उमेदवारी मिळेल या आशेवर काम करत आहेत. मात्र, आयात उमेदवारासाठी पक्ष सरसावला असेल, तर त्यात पक्षाचेच अधिक नुकसान आहे. त्यांनी पक्ष निरीक्षक आषीष पवार यांच्या समोरही हा मुद्दा मांडल्याचे नमूद केले.पत्रकार परिषदेत त्यांनी शेवटी असेही स्पष्ट केले की, महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांपैकी (ज्या पक्षाला जागा सुटेल) कोणत्याही पक्षाचा उमेदवार दिल्यास, त्याचे काम आम्ही ईमाने, इतबारे पार पाडू.व्ही. पी. पाटील यांच्या या भूमिकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडीवर महत्त्वाचा प्रभाव पडू शकतो.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा