जामनेरात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बनवली इलेक्ट्रिक सायकल
जामनेर शहरातील एका शेतकरी कुटुंबातील बाप-लेकाच्या जोडीने स्वतःची इलेक्ट्रिक सायकल बनवून कौतुकाचे केंद्रबिंदू बनले आहेत. निलेश पाटील आणि त्यांचा आठवीत शिकणारा मुलगा मानस निलेश पाटील यांनी मिळून ही सायकल तयार केली आहे. या सायकलची खासियत आणि त्यांची प्रेरणादायक कहाणी पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये.
स्वप्नांचा पाठलाग करणारा विद्यार्थी: मानस निलेश पाटील
मानस पाटील, जामनेरच्या एका साध्या कुटुंबातील आठवीत शिकणारा विद्यार्थी. सायकल चालवण्याच्या आवडीतून त्याला इलेक्ट्रिक सायकल बनवण्याची कल्पना सुचली. नेहमीच्या सायकलवर लांबचा प्रवास करणे अवघड होते, म्हणून मानसने आपल्या साध्या सायकलचे इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतर करण्याचे ठरवले. वडिलांच्या मदतीने, अवघ्या पाच दिवसांत त्यांनी ही सायकल तयार केली. या सायकलचे उत्पादन करण्यासाठी त्याला 11 हजार रुपये खर्च आले आहेत.
सायकलची वैशिष्ट्ये
मानसची इलेक्ट्रिक सायकल पाच तासांच्या चार्जिंगमध्ये 24 किमी प्रतितासाच्या वेगाने तब्बल 25 किलोमीटर चालते. शिक्षण सांभाळून दिवसातून तीन ते चार तास या प्रकल्पावर काम करून, मानसने केवळ पाच दिवसांत आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
पर्यावरणस्नेही सायकलचे भविष्य
मानसचे वडील निलेश पाटील यांचे मत आहे की, जर अशा प्रकारचे अधिक युनिट तयार केले गेले तर इलेक्ट्रिक सायकल अधिक स्वस्तात तयार होऊ शकते. ही सायकल केवळ परवडणारीच नाही तर वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासही महत्त्वाची आहे.
भविष्यातील स्वप्ने
मानस पाटीलची एक मोठा इंजिनियर होऊन देशासाठी काही नवीन करण्याची इच्छा आहे. त्याने आत्तापासूनच आपल्या मेहनतीने आणि कल्पकतेने हे दाखवून दिले आहे. त्यामुळे भविष्यात तो नक्कीच एक मोठा इंजिनिअर बनेल आणि त्याचा देशाला फायदा होईल, यात दुमत नाही. सध्या जामनेर शहरासह जळगाव जिल्ह्यामध्ये मानस पाटीलचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही प्रेरणादायक कहाणी निश्चितच अनेकांना प्रोत्साहन देईल, की कोणत्याही वयात आणि परिस्थितीतही आपले स्वप्न पूर्ण केले जाऊ शकते, फक्त त्यासाठी धैर्य आणि मेहनतीची गरज आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा