जामनेर शहरात जामनेरकरांचा चिंतामणी बाप्पाच्या मूर्तीचे थाटात आगमन...
आज जामनेर शहरात जामनेरकरांचा चिंतामणी गणेश मूर्तीचे थाटामाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन पार पडले. गणपती बसवायला अजून दोन दिवस बाकी असताना गणेश मंडळांनी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी केली. गणरायाच्या आगमनानंतर आता शहरात गणेशोत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू झाली आहे.या सोहळ्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. त्यांनी श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले आणि उत्सवाच्या तयारीसाठी शुभेच्छा दिल्या. ढोल-ताशांच्या गजरात मूर्तीचे आगमन झाले, ज्यामध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
पोलीस प्रशासनाने सोहळ्याच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता. या आगमन सोहळ्यामुळे जामनेरमध्ये गणेशोत्सवाची एक वेगळीच रंगत आली आहे. मिरवणुकीत माननीय जितेंद्र पाटील, माननीय महेंद्र बाविस्कर सहभागी झाले होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा