आनंदयात्री परिवाराचा शिक्षक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप...
जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने आनंदयात्री परिवारातर्फे शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वीच्या सर्व १९८ विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला २ नोटबुक, १ पेन, पेन्सिल, आणि खोडरबर देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष डॉ. अमोल सेठ होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेश सोनवणे, डॉ. आशिष महाजन, कडू माळी, आणि मुख्याध्यापक पी.टी. पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा सत्कार शाल आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. मुख्याध्यापक पी.टी. पाटील आणि डॉ. अमोल सेठ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत शेळके सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन नाना धनगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील उपशिक्षक कैलास महाजन, रामेश्वर आहेर, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती छाया पारधे, आणि श्रीमती निर्मला महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा