महाराष्ट्र
सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत मंद्रूप पोलीस ठाणे आयोजित रक्तदान, गणराया पारितोषिक वितरण आणि वृक्षारोपण उपक्रम कार्यक्रम संपन्न ...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप ) : दि. १० सप्टेंबर रोजी मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस यांचे संकल्पनेतून मंद्रुप पोलीस ठाण्याच्यावतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर, गणराया पारितोषिक वितरण, वृक्षारोपण आणि गणेश मंडळांना वृक्षवाटप या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमामध्ये पर्यावरण संरक्षण आणि समाजहिताच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी आपले मनोगतातून संदेश दिली की,पोलीस ठाणे हद्दीत महिला सुरक्षा तसेच शाळेतील शाळा, कॉलेज येथील मुली यांची सुरक्षितता व जागृता निर्माण व्हावी. यामुळे शाळा कॉलेज मध्ये पोलीस काका, पोलीस दिदी कार्यक्रम राबविण्याबाबत तसेच तक्रारपेटी ठेवण्याबाबत संदेश दिला. तसेच गणेशोत्सव काळात पर्यावरण पुरक व सामाजहित साध्य होईल अशा वेगवेगळ्या उपक्रम राबवावे.तसेच पोलीस ठाणे हद्दीतील शेती विषयी तक्रारी बाबत बांधावर जावून वाद विवाद मिटवावे तसेच शेतकऱ्यांनी निसर्गाचेसमतोल राखण्याकरिता आपल्याबांधावर व परिसरात मोठ्या प्रमाणात फळ झाडे व वृक्षारोपण करावे, असे मार्गदर्शनकेले.सन २०२३ मधील गणेशोत्सव पार पाडताना समाजाहिताचे कार्यक्रम राबविणारे गणेश मंडळांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. तसेच गणेश मंडळांना वृक्षारोपण करणे करिता १५०० विविध प्रकारची झाडे वाटपकरण्यात आले. समाजातील गरजू रुग्णांसाठी मंद्रुप पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. सदर वेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्राम सुरक्षा दल सदस्य, पोलीस ठाणेहद्दीतील ग्राम पंचायत सदस्य, पत्रकार बंधू, पोलीस पाटील व पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी रक्तदान केले. रक्तदान कार्यक्रमास उत्पुर्स प्रतिसाद देवून विक्रमी १८२ रक्तदात्यानी रक्तदान केले. छत्रपती शिवाजी महाराजसर्वोपचार रुग्णालय, सोलापूर तसेच सिध्देश्वर रक्तपेढी उपस्थित होते. संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग, सोलापूर ग्रामीण यांनी आपल्या मार्गदर्शनात वृक्षारोपण करण्याबाबतचे महत्त्व सांगितले तसेच गणेशोत्सव २०२३ मधील सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग, सोलापूर ग्रामीण जितेंद्र मोरे नायब तहसीलदार मंद्रुप,ग्रामपंचायत सरपंच, पत्रकार बंधू, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, रक्तदाते, श्री. गणेश मंडळाचे पदाधिकारी, परीक्षक टिम, पर्यावरण दुत डॉ. मनोज देवकर, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी सोलापूर पथक प्रमुख डॉ. ऐश्वर्या मुंढे, डॉ. माधुरी जैन त्यांचे पथकातील १२ व्यक्ती, सिध्देश्वर ब्लड सेंटर सोलापूर पथक प्रमुख डॉ. हरीशचंद्र गलीचाल त्यांचे पथकातील १० व्यक्ती व पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार आदी उपस्थित होते. मनोज पवार प्रभारी अधिकारी मंद्रूप पोलीस ठाणे यांनी आपल्या आभार प्रदर्शनात मंद्रुप पोलीस ठाणेतील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या अथक परिश्रमामुळे सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाल्याचे सांगितले. तसेच सरपंच, पत्रकार बंधू, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, रक्तदाते, श्री. गणेश मंडळाचे पदाधिकारी, परीक्षक टिम, पर्यावरण दुत डॉ. मनोज देवकर, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, रक्तपेढी सोलापूर पथक प्रमुख डॉ. ऐश्वर्यामुंढे, सिध्देश्वर ब्लड सेंटर सोलापूर पथक प्रमुख डॉ. हरीशचंद्र गलीचाल तसेच उपस्थित नागरिक यांचे आभार मानले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा