महाराष्ट्र
मंद्रुप पोलीस स्टेशची धडाकेबाज कामगिरी... अवैध दारू वाहतुक करणाऱ्या दोन इसमावर कारवाई ; एकुण ४,९५,०००/-रू चा मुद्देमाल जप्त.....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : पोलीस अधीक्षक सोलापुर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी गणपती उत्सव अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरीता आदेशीत केले होते.
दि. १५ सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार मंद्रुप पोलीस ठाणे यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली कि, १३ मैल ते औराद जाणारे रोडवरून एका चारचाकी वाहनातुन अवैध दारूची वाहतुक होणार असल्याची बातमी मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजु डांगे व त्याचे पथक तात्काळ कारवाई करणेसाठी तेरा मैल ते औराद रोडवर खाजगी वाहनाने रवाना होवुन नर्सगौंडा वस्तीजवळ वळण रस्त्यावर दबा धरून बसले थोड्या वेळाने एक लाल रंगाची चारचाकी वाहन भरधाव वेगात औराद चे दिशेने येत असल्याची दिसली त्याचा संशय आल्याने सर्वानी हाताचा इशारा करून सदर वाहनास थांबविले सदर वाहनाची तपासणी करता त्यात खाकी पुट्ट्याचे बॉक्समध्ये विदेशी कंपनीची दारूचे बाटल्या आढळुन आल्या सदर वाहन चालकास त्याचे नांव विचारता त्याने त्याचे नांव अक्षय महेश पाटील रा. सुलेरजवळगी ता. अक्कलकोट असे असल्याचे सांगितले व त्यास दारू वाहतुक पास परवाना आहे का याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. त्याचे वाहनात मिळुन आलेल्या बॉक्सची तपासणी करता त्यात इम्पेरीयल ब्लू , डी.एस.पी. ब्लॅक, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज इ. विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या आढळुन आल्या.
अक्षय महेश पाटील रा. सुलेरजवळगी ता. अक्कलकोट जि. सोलापुर याचे ताब्यातुन दारू वाहतुक करणेस वापरलेली ३,५०,०००/-रू किमंतीची एक लाल रंगाची मारुती सुझीकी कंपनीची स्वीप्ट कार व ८५४४० /-रू किमंतीची वेगवेगळया कंपनीची विदेशी दारूचे बाटल्या असे एकुण ४,३५,४४०/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर इसमाविरुध्द दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे मंद्रुप शहरातील एस.टी.स्टॅड ते कंदलगांव जाणारे रोडवर मलप्पा चद्राम सलगरे रा. कंदलगांव ता. दक्षिण सोलापुर आपले ताब्यातील मोटार सायकल वरती देशी व विदेशी कंपनीच्या दारूची वाहतुक करत असतांना मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन मोटार सायकल व देशी विदेशी दारूचे बाटल्यासह ५९,५६०/-रु मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर इसमाविरुध्द दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १५ सप्टेंबर रोजी अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबवुन दोन्ही कारवाईत एकुण ४,९५,०००/-रू किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी हि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापुर विभाग संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक पोलीस फौजदार संदीप काशीद, पोलीस अंमलदार संदीप काळे, माजीद शेख, राजकुमार जिराळ, चंद्रकांत सुतार, कृष्णा पवार, सचिन मसलखांब, अंकुश मोरे यांनी बजावली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा