मंत्री गिरीश महाजन यांनी जखमी भाजपा कार्यकर्ते कैलास पालवे यांची घेतली रुग्णालयात भेट.... - दैनिक शिवस्वराज्य

मंत्री गिरीश महाजन यांनी जखमी भाजपा कार्यकर्ते कैलास पालवे यांची घेतली रुग्णालयात भेट....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर येथील शास्त्रीनगर परिसरातील भाजपाचे कार्यकर्ते कैलास पालवे यांच्यावर दहीहंडी उत्सवाच्या दिवशी गंभीर अपघात झाला. दहीहंडी त्यांच्या अंगावर पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते.जखमी झाल्यानंतर त्यांना तात्काळ मुंबई येथील भाटिया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन यांनी स्वतः पालवे यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टर व हॉस्पिटलचे मॅनेजमेंट यांच्याशी चर्चा करून पालवे यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पालवे यांची तब्येत सध्या स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. मंत्री महाजन यांनी पालवे यांच्या जलद प्रकृती सुधारासाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्याचे आश्वासन दिले आहे.
कैलास पालवे हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, जामनेर परिसरात त्यांचे मोठे योगदान आहे.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads