जामनेर तालुक्यातील आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढणार..शेंदूर्णी, वाकोद, वाकडी केंद्रांचा समावेश - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढणार..शेंदूर्णी, वाकोद, वाकडी केंद्रांचा समावेश

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील आरोग्य केंद्रांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या देखरेखीखाली, आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सेवासुविधांचा दर्जा वाढविण्याचा संकल्प केला आहे. पहिल्या टप्प्यात शेंदूर्णी, वाकोद, वाकडी येथील आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.
वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन नामांकन प्रक्रियेची तपासणी करण्यात आली. प्राचार्य, आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. संतोष कडले, अभिषेक वैद्य (बुलढाणा), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिनिधी वैशाली गर्ग, श्रीशष्मा आणि कृष्णा वेणी यांनी हे आरोग्य केंद्र भेट दिली.  
तपासणीच्या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, डॉ. इरेष पाटील, डॉ. किरण पाटील, डॉ. सागर पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. विवेक जाधव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनीषा वाकोडे, तालुका मलेरिया सुपरवायझर प्रवीण दाभाडे, आरोग्य सहाय्यक भागवत वानखेडे, विक्रमसिंह राजपूत, गोपाळ पाटील, व्ही.एच. माळी, आरोग्य सहायिका सुरेखा गोसावी, शोभा घाटे यांच्यासह अनेक आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांनी देखील या प्रक्रियेत भाग घेतला.
या उपक्रमामुळे जामनेर तालुक्यातील आरोग्य सेवांचा दर्जा नक्कीच उंचावेल आणि नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads